
कास : सुटीच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पठारावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात येईल. त्यामुळे कमीतकमी वाहने पठारावर येतील याची दक्षता घ्यावी.कास पठार हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ असून, त्याचा दर्जा आणखी उंचविण्यासाठी ग्रामस्थांसह सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे, असे मत जिल्हा उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी व्यक्त केले.