
Devotees in grief after a Mhasvad youth died in a road accident near Tuljapur while bringing the sacred jyot.
esakal
म्हसवड : दुर्गा उत्सवानिमित्त तुळजापूर येथून ज्योत आणण्यासाठी निघालेल्या येथील दुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या टेंपोचा तुळजापूरजवळ झालेल्या अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले. दत्तात्रय भगवान पिसे (वय १६, रा. म्हसवड) असे मृत युवकाचे नाव आहे.