
“Biker fatally injured in Malkapur as a dog collides with motorcycle on rural road near Karhad-Dhebevadi.”
Sakal
मलकापूर: श्वान आडवे आल्याने दुचाकीची दुभाजकाला धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला आहे. कऱ्हाड -ढेबेवाडी मार्गावर आगाशिवनगर, मलकापूर, (ता. कऱ्हाड) येथील जाधववस्तीजवळ दुपारी पावणेएक वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. इंद्रजित अधिकराव कणसे (वय ३६, रा. दत्तशिवम कॉलनी, आगाशिवनगर, मलकापूर, ता. कऱ्हाड) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.