
वाई : तालुक्याच्या पश्चिम भागात असलेल्या किल्ले रायरेश्वरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पुण्यातील पिंपरी- चिंचवड येथील एका पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. शनिवारी (ता. २८) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. मयूर चंद्रकांत चौधरी (वय ४२, रा. सिग्नेचर पार्क, डांगे चौक, पिंपरी- चिंचवड, पुणे) असे मृत पर्यटकाचे नाव आहे.