

satara Accident
Sakal
काशीळ : पुणे- बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव (ता. सातारा) गावच्या हद्दीत चारचाकी व दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील युवकाचा मृत्यू झाला आहे. सागर सुभाष शिवणकर (वय २५, रा. खर्शी तर्फ कुडाळ, ता. जावळी) असे मृत युवकाचे नाव असून, तो सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत नागठाणे शाखेत लिपिक पदावर कार्यरत होते. याप्रकरणी बोरगाव पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.