
-रूपेश कदम
दहिवडी : सातारा जिल्हा परिषद अंतर्गत शिक्षकांच्या बदल्या सतत या ना त्या कारणाने चर्चेत आहेत. संवर्ग एकमधील बोगसगिरी मोठ्या प्रमाणात उघड झाल्याने त्यांच्यावर कारवाईचा फास आवळला जात आहे. अशातच संवर्ग दोनमध्ये सुद्धा शिक्षकांनी बोगसगिरी केल्याचे दिसून आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी काय कारवाई करणार व संवर्ग दोनमध्ये बोगसगिरी करणाऱ्या शिक्षकांवर कारवाई कधी करणार? याकडे जिल्ह्यातील शिक्षणप्रेमींचे लक्ष लागले आहे.