
भिलार: सनपाने (ता. जावळी) येथील सुपुत्र सनदी अधिकारी ओंकार पवार यांची नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली झाली आहे. त्यांनी आज आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली. सध्या ते इगतपुरी उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून काम करीत होते.