

रूपेश कदम
दहिवडी : ‘बनावट दिव्यांग शिक्षकांवर होणार कारवाई?’ या मथळ्याखाली आज ‘सकाळ’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमुळे बदलीसाठी विविध फंडे वापरणाऱ्या शिक्षकांची चांगलीच तंतरली आहे. या शिक्षकांसोबतच बोगसगिरीला खतपाणी घालणाऱ्या वैद्यकीय, तसेच इतर अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. या महत्त्वपूर्ण मुद्द्याला उचलून धरल्याबद्दल पात्र शिक्षकांनी ‘सकाळ’ला धन्यवाद दिले.