"Mayanichowk to Get New Look: Highway Upgraded to National Road"

"Mayanichowk to Get New Look: Highway Upgraded to National Road"

Sakal

Satara News: 'मायणीत बदलणार चांदणी चौकाचे रुपडे'; राज्यमार्गाचे राष्ट्रीयमध्ये रूपांतर, आयलँडसह वाहनतळ उभारणीची मागणी

"Mayanichowk to Get New Look: पुणे-बंगळूर राज्यमार्गाला पर्यायी रस्ता म्हणून केंद्र शासनाने पुणे, सातारा, सांगली जिल्ह्यांतून जाणारा राष्ट्रीय महामार्ग १६० चौपदरीकरणाचे काम हाती घेतले आहे. हे काम प्रगतिपथावर असून, हे काम मायणी चांदणी चौकापर्यंत पोहोचले आहे.
Published on

-अंकुश चव्हाण

कलेढोण: सांगली-भिगवण या राज्यमार्गाचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६० मार्गात रूपांतर झाल्यानंतर रुंदीकरणाच्या कामास मोठी गती आली आहे. हा महामार्ग दहिवडी-कातरखटाव- मायणी-विट्यामार्गे पुढे जात आहे. यादरम्यान मायणी शहरातील मुख्य चांदणी चौक मल्हारपेठ-पंढरपूर रस्त्याला मिळतो. रस्ता रुंदीकरणात शासकीय व खासगी जागेतील दुकानगाळे, भाजी मंडईही येते. त्यामुळे रस्ता रुंदीकरणात दोन्ही बाजूकडील किती जागा, दुकान गाळे जाणार? याची मायणीत जोरदार चर्चा सुरू असून, नागरिक संभ्रमावस्थेत आहेत. ग्रामपंचायतीच्या वतीने सातारा प्राधिकरणाकडे राज्यमार्गातील अनेक सोयीसुविधा पुरविण्याबाबत पत्रव्यवहार केला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com