राज्यात दंगली भडकवणाऱ्यांवर कारवाई करा; भाजपाची पोलिसांकडे मागणी I BJP | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BJP

या घटनांमध्‍ये जिहादी विचारसरणीच्‍या व्‍यक्‍ती, संघटनांचा सहभाग असल्‍याचे समोर येत आहे.

राज्यात दंगली भडकवणाऱ्यांवर कारवाई करा; भाजपाची पोलिसांकडे मागणी

सातारा : त्रिपुरा (Tripura Violence) येथे झालेल्‍या दंगलीचा निषेध करण्‍यासाठी राज्‍यात बंद पुकारत तोडफोड, जाळपोळ करणाऱ्यांवर कारवाईची मागणी आज भाजपाचे (BJP) जिल्‍हाध्‍यक्ष विक्रम पावसकर (Vikram Pawaskar) यांनी निवेदनाव्‍दारे पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्‍सल (Police Ajay Kumar Bansal) यांच्‍याकडे केली. या निवेदनात सातारा परिसरात अशा घटना घडू नयेत, यासाठी घुसखोरांचा शोध घेण्‍याची मागणीही करण्‍यात आली आहे.

श्री. पावसकर यांच्‍यावतीने हे निवेदन भाजपाचे शहराध्‍यक्ष विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार तसेच इतरांनी ते श्री. बन्‍सल यांना दिले. या निवेदनात त्रिपुरा येथे झालेल्‍या तोडफोड, जाळपोळीचा निषेध करण्‍यासाठी नांदेड, अमरावती तसेच इतर भागात बंद पुकारण्‍यात आला होता. यावेळी काही समाजकंटकांनी तोडफोड, जाळपोळ, लुटालुट केली होती.या घटनांमध्‍ये जिहादी विचारसरणीच्‍या व्‍यक्‍ती, संघटना यांचा सहभाग असल्‍याचे समोर येत आहे.

हेही वाचा: Tripura Violence : 'जाणीवपूर्वक अशांतता निर्माण करणाऱ्यांना सोडणार नाही'

या संघटनांकडून राज्‍यात पुन्‍हा तशा प्रकारची पुनरावृत्ती होवू नये, यासाठी आवश्‍‍यक त्‍या उपाययोजना पोलिसांनी राबविणे आवश्‍‍यक असल्‍याचे मतही निवेदनात व्‍यक्‍त करण्‍यात आले आहे. सातारा शहरात अशी घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी बांगलादेशी, रोहिंग्‍या, तालिबानी यांचा सातारा परिसरातील वावर, वास्‍तव्‍य शोधत त्‍यांना अटक करण्‍याची, तसेच सातारा जिल्‍ह्यातील शांतता कायम राखण्‍यासाठी आवश्‍‍यक त्‍या उपाययोजना राबविण्‍याची मागणीही पावसकर यांनी निवेदनाव्‍दारे बन्‍सल यांच्‍याकडे केली आहे.

हेही वाचा: किम जोंग उनची तब्येत खालावली! हुकूमशहा एका महिन्यापासून 'बेपत्ता'

loading image
go to top