Tripura Violence : त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आजपासून कलम 144 लागू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tripura Violence

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश (कलम 144) लागू केले आहे.

त्रिपुरा घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आजपासून कलम 144 लागू

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : त्रिपुरा (Tripura Violence) राज्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह (Collector Shekhar Singh) यांनी जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश (कलम 144) लागू केले आहे. याची अंमलबजावणी आजपासून 22 नोव्हेंबरपर्यंत राहणार आहे. या कालावधीत जिल्ह्यात घेण्यात येणाऱ्या ग्रामसभा, शासकीय बैठका, शासकीय कार्यक्रम व पोलिस विभागाकडून परवानगी घेऊन करीत असलेले कार्यक्रम यांना वगळून प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.

या प्रतिबंधात्मक आदेशानुसार पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोकांनी जमाव जमवून सभा घेणे, मोर्चा काढणे धार्मिक तेढ निर्माण करण्यासाठी महाआरती, नमाज पठण, तसेच इतर धार्मिक विधी करणे, एकत्र येऊन घोषणाबाजी, जल्लोष या बाबी सार्वजनिक ठिकाणी करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. कोणीही व्यक्ती इंस्टाग्राम, व्हॉट्‌सॲप, ट्वीटर, फेसबुक इत्यादी समाज माध्यमांचा वापर करून जातीय तणाव निर्माण करणाऱ्या अफवा, आक्षेपार्ह संदेश पसरविणे.

हेही वाचा: एसटी कर्मचाऱ्यांत तुंबळ हाणामारी; वाहकानं नियंत्रकाच्या डोक्यात घातला दगड

अशाप्रकारच्या अफवा, आक्षेपार्ह मजकुराचा संदेश पसरविणारा नाही, शेअर करणार नाही किंवा टाकणार नाहीत. याबाबत सर्वस्वी जबाबदारी ग्रुप ॲडमिनची राहील. कोणत्याही प्रकारचे जातीय तणाव निर्माण करणारे मजकुराचे देखावे, तसेच फ्लेक्स बोर्ड लावणे त्या प्रकारच्या प्रक्षोभक घोषणा देणे, पत्रके वाटणे, समाज माध्यमामध्ये चुकीची माहिती, अफवा जाणीवपूर्वक प्रसारित अथवा प्रकाशित करणे आदी गोष्टींस या आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे.

हेही वाचा: 'निवडणुकीत गृहराज्यमंत्र्यांकडून पैशाचा वापर'

loading image
go to top