esakal | पुणे-बंगळूरु NH-4 महामार्गावर कर्नाटकचा तेलाचा ट्रक पलटी
sakal

बोलून बातमी शोधा

Truck accident

खंडाळा गावाजवळ एका वळणावर आज (गुरुवार) तेलाचे डबे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला.

पुणे-बंगळूरु NH-4 महामार्गावर कर्नाटकचा तेलाचा ट्रक पलटी

sakal_logo
By
अशपाक पटेल

खंडाळा (सातारा) : सातारा-पुणे महामार्गावर खंबाटकी बोगदा ओलांडताच पहिल्याच वळणावर भरधाव वेगात जाणारा तेलाचा ट्रक पलटी झाल्याने दोघेजण किरकोळ जखमी झाले. मात्र, अपघातामुळे महामार्गावर सर्वत्र गोडेतेल सांडल्याने महामार्गावरुन जाताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊनच जावे लागत होते.

हेही वाचा: महाबळेश्वरात चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला पेटवले

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी, की, हुबळी (कर्नाटक) वरुन पुणे येथे गोडेतेल घेऊन भरधाव वेगात जाणारा मालट्रक (गाडीक्रमांक केए 01.एके.4514 ) आज सकाळी सात वाजता पलटी झाला. या अपघातात चालक सुलेमान शरीफ साहब नदाफ (वय 25) व क्लिनर शिवराज बसय्या करडीमळ (वय 35 ) दोघेही रा. हुबळी कर्नाटक हे किरकोळ जखमी झाले.

हेही वाचा: राज्यात आयटीआयसाठी 2.57 लाखांवर अर्ज

ट्रकमध्ये असणारे गोडे तेलाच्या पिशव्या व डबे फुटल्याने गोडेतेल हे रस्त्यावर सांडल्याने रस्ता घसरटा झाला. यावेळी रस्त्यावर माती टाकून, तसेच अग्निशामक दलाच्या टँकरने रस्ता साफ करून रस्त्यावरील सांडलेले तेल साफ करण्यात आले. तरीही एक छोटा टॅंपो (छोटा हत्ती) पलटी झाला. मात्र, सुदैवाने काहीही झाले नाही. तर, एक वाहन सापासारखे फरफटत गेले, यानंतर मात्र खंडाळा पोलिस व महामार्ग पोलिसांनी वाहनांचा वेग आटोक्यात आणण्यासाठी बॅरिकेट्स लावले. घटनास्थळी तात्काळ वाहतूक पोलीस उपनिरीक्षक एस. के. पोवार, खंडाळा पोलिस ए. बी. जाधव, यादव, वाहतूक पोलीस अविनाश डेरे, प्रमोद, फरांदे, लक्ष्मण जाधव यांनी धाव घेऊन मदतकार्य करुन परिस्थिती नियंत्रणात आणलीय. तसेच गोडेतेलचा वाढता दर पाहता बघ्यांनी तेलाचे डबे व पिशव्या ही लंपास केल्या.

loading image
go to top