सातारा : नायगावच्या शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील प्रकार; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले.Sakal

सातारा - उद्योजकाने शेतीचे नुकसान केल्याने संतप्त झालेल्या नायगाव (ता. खंडाळा) येथील शेतकऱ्याने आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून संबंधित शेतकऱ्याला ताब्यात घेतले. संजय गोपाळ नेवसे (रा. नायगाव) असे संबंधित शेतकऱ्याचे नाव आहे. उद्योजकाने केलेल्या शेतीच्या नुकसानीचा पंचनामा करून मला न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. श्री. नेवसे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार असल्याची नोटीस दिली होती. त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळपासूनच पोलिस बंदोबस्त व अग्निशामक सज्ज ठेवण्यात आले होते. अचानक श्री. नेवसे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेश द्वारासमोर आले व त्यांनी पिशवीतून आणलेली रॉकेलची बाटली अंगावर ओतून घेतली.

पोलिसांनी प्रसंगावधान राखत त्यांना ताब्यात घेतले. दरम्यान, आत्मदहनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी सातारा पोलिसांनी शहर पोलिस ठाण्यात नेवसे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात शेतकरी संजय नेवसे यांनी सांगितले, की त्यांच्या मालकी हक्काच्या शेतीचे आठ महिन्यांपासून नुकसान होत आहे. याबाबत तलाठी, मंडलाधिकारी, प्रांताधिकारी, तसेच जिल्हाधिकारी यांना वेळोवेळी निवेदने दिली; पण आमच्याकडे सर्वांनी दुर्लक्ष केले. उलट तत्कालीन तहसीलदार व तलाठी मनीषा शिंदे यांनी खोटा पंचनामा करून शासनाचा कोट्यवधीचा महसूल बुडवला आहे. त्यामुळे मी वैतागून आत्मदहनाचा निर्णय घेतला असल्याचे श्री. नेवसे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com