esakal | नांदेड, हिंगोलीत हळदीचे क्षेत्र वाढले; साता-यात दर घसरला

बोलून बातमी शोधा

Turmeric
नांदेड, हिंगोलीत हळदीचे क्षेत्र वाढले; साता-यात दर घसरला
sakal_logo
By
साहेबराव होळ

गोडोली (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यात मागील वर्षी हंगामात पाऊस समाधानकारक झाल्याने सातारा, वाई, कोरेगाव तालुक्‍यांत हळदीची सर्वाधिक लागण झाली होती. कृष्णाकाठी हळदीचे मोठे उत्पन्न घेतले जाते. मागील हंगामात अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर लागण सुरू झाली व जूनअखेर उशिराची लागण झाली. वर्षभर शेतकऱ्यांनी भांडवली खर्च केला. पण. सुरवातीला 25 हजार रुपये क्विंटलचा दर मिळाला. पण, सध्या 9 ते 11 हजार रुपये प्रतवारीनुसार दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.

मागील वर्षी नांगरट, कुळवणी, रान तापवणे, सरी घालणे, शेणखत घालताना जुने गंडे 3,600 रुपये प्रति क्विंटलने घेतले. अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर लागण झाली. एकरी सुमारे एक ते दीड लाखांपर्यंतचा खर्च झाला. हळदीचा पाला कापल्यानंतर एकरी 20 हजार रुपये खांदणी खर्चाशिवाय हळद कुकरमध्ये शिजवणे, वाळवणे, पॉलिश करणे यासाठीही मोठा खर्च करावा लागला. आगाप हळद सांगली बाजारपेठेत गेली की, या वर्षी 25 ते 28 हजार रुपये क्विंटल दर मोजक्‍याच शेतकऱ्यांना मिळाला. आवक वाढल्याने 8 ते 10 हजार रुपये क्विंटलवर दर आला आहे.

अलीकडे नांदेड, हिंगोली परिसरात हळदीचे क्षेत्र वाढले आहे. त्याचाही परिणाम दरावर होत आहे. व्यापारी हे पोत्यामागे 2 ते 4 किलो कापतात. सध्या सोरा गंडा- 19 ते 20 हजार क्विंटल, तर हळदीला 9 ते 10 हजार रुपये दर मिळत आहे. या वर्षी कोरोनामुळे मजुरीसाठी दीडपट खर्च करावा लागला. डिझेल दरवाढीमुळे सगळ्याच यांत्रिक कामाला अधिक पैसे मोजावे लागले. शेवटी शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित पैसा आलाच नाही.

हळदीला कायमस्वरूपी उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव मिळाला पाहिजे. तसेच प्रतवारीनुसार कायम दर व्यापाऱ्यांनी द्यायला हवा. व्यापाऱ्यांनी पोत्यामागे वजन घट घ्यायला नको, तरच उत्पादक शेतकरी टिकेल.

- राजेंद्र गायकवाड, कृषिभूषण शेतकरी

हनी ट्रॅप करुन मोहिते-पाटलांना अडकविण्याचा प्रयत्न; एकास अटक

मोदींच्या वल्गना त्यांच्याच अंगलट; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात