esakal | मोदींच्या वल्गना त्यांच्याच अंगलट; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात

बोलून बातमी शोधा

Prithviraj-Chavan
मोदींच्या वल्गना त्यांच्याच अंगलट; पृथ्वीराज चव्हाणांचा घणाघात
sakal_logo
By
सचिन शिंदे/सिद्धार्थ लाटकर

कऱ्हाड (जि. सातारा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 2021 मध्ये जागतिक आर्थिक परिषदेसमोर भाषणावेळी भारताने कोरोनाला कसे हरवले, अशा वल्गना करून स्वतःचीच पाठ थोपटून घेण्याचा हास्यास्पद प्रकार केला होता. तो आता त्यांच्याच अंगलट येत आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. ऑक्‍सिजन तुटवड्याने देशात दुरवस्था झाली आहे. त्याला जबाबदार असलेल्या केंद्रीय आरोग्यमंत्र्यांसह त्यांच्या सहकाऱ्यांना तातडीने पदावर काढून टाकले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

ऑक्‍सिजन तुटवड्याला केंद्र सरकारचा फाजील आत्मविश्वास कारणीभूत आहे. देशात ऑक्‍सिजनच्या कमतरतेला पूर्णपणे केंद्र सरकारच जबाबदार आहे, असे सांगून आमदार चव्हाण म्हणाले,"" केंद्रीय आरोग्य सचिवांनी पत्रकार परिषद घेऊन वैद्यकीय ऑक्‍सिजन पुरवठ्याबाबत देश सुस्थितीत आहे, असे स्पष्ट केले होते. मागील 10 महिन्यांत वैद्यकीय ऑक्‍सिजनचा तुटवडा जाणवला नाही व जाणवणारही नाही, असेही सांगताना शासनाने देशभरात 390 दवाखान्यांत पीएसए पद्धतीचे ऑक्‍सिजननिर्मिती प्लॅन्ट उभारण्याचे नियोजन आहे. कोरोनाची संभाव्य वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन केंद्राने एक लाख टन द्रवरूप वैद्यकीय ऑक्‍सिजन आयातची प्रक्रिया सुरू केली आहे, असेही त्यावेळी सचिवांनी सांगितले होते.

झाला निर्णय;18 ते 44 वयोगटातील लसीकरणासाठी माेजावे लागणार पैसे

केंद्र सरकारने अतिरिक्त एक लाख एमटी ऑक्‍सिजन आयात खरेदी करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे स्पष्ट असले तरी प्रत्यक्षात मात्र मोदी सरकारने काहीच केलेले नाही. त्यामुळे देशाला अभूतपूर्व ऑक्‍सिजन तुटवडा भासत आहे. ऑक्‍सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू होत आहेत. ऑक्‍सिजनसाठी दिल्लीतील खासगी रुग्णालयांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागते आहे, असे अत्यंत विदारक चित्र आहे.''

ते म्हणाले,""आत्तापर्यंत देशभरात मंजूर केलेल्या 162 पीएसए पद्धतीच्या ऑक्‍सिजननिर्मिती प्लॅन्टपैकी फक्त 33 दवाखान्यांत उभे केले आहेत. त्यात महाराष्ट्रात फक्त एक प्लॅन्ट उभारला आहे, हे खरे आहे का? पंतप्रधान मोदी यांनी जानेवारी 2021 मध्ये जागतिक आर्थिक परिषदेसमोर भाषण करताना भारताने कोरोनाला कसे हरवले, अशा वल्गना करून स्वतःचीच पाठ थोपटवून घेण्याचा हास्यास्पद प्रकार आता त्यांच्याच अंगलट येतो आहे. जगातील 50 पेक्षा अधिक देशांनी भारतातून येणाऱ्या विमानांना बंदी घातली आहे. ऑक्‍सिजन मिळविण्यासाठी त्यांच्यासमोर हात पसरावे लागत आहेत.''

स्मशानभूमीतील व्हिडिओ व्हायरल; मनोरुग्णाच्या कृतीने खळबळ

लाेकांचा जीव वाचणे महत्वाचे की उद्‌घाटन; निर्णय झाला पाहिजे