Satara News: तुषार दोशी साताऱ्याचे नवे पोलिस अधीक्षक; समीर शेख यांची मुंबईला, २१ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या
समीर शेख यांनी नोव्हेंबर २०२२ पासून सातारा पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहिले. या कालावधीत प्रतापगडावरील अफजल खान कबरीच्या परिसरातील वादग्रस्त बांधकाम हटविण्यात आले. त्याचबरोबर जिल्ह्यातील विधानसभा व लोकसभेच्या निवडणुका शांततेत पार पडल्या.
Tushar Doshi takes charge as the new Superintendent of Police in Satara after major state-level police transfers.Sakal
सातारा : पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बदली झाली असून, लोहमार्ग पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांची साताऱ्याचे नवीन पोलिस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रात्री आठच्या सुमारास त्यांनी पोलिस अधीक्षकपदाचा पदभारही स्वीकारला.