सुरपाट्याचा खेळामुळे 'या' जिल्ह्यात घराेघरी वाढले टेंशन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जून 2020

तेथील माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर अडीच ते तीन तास हा खेळ रंगलेला होता, असे ग्रामस्थांनी सांगितले.
 

ढेबेवाडी (जि.सातारा) : कोरोना बाधित रुग्णाच्या निकट सहवासातील व्यक्तीसोबत खेळलेला सुरपाट्याचा खेळ कुंभारगाव (ता. पाटण) येथील अनेक कुटुंबांचे टेंशन वाढवायला कारणीभूत ठरला आहे. या प्रकारामुळे तेथील 25 खेळाडूंची टीम क्वारंटाइन करण्यात आली असून, निकट सहवासितांच्या स्वॅब तपासणीच्या रिपोर्टकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
 
ढेबेवाडी भागात मुंबईमार्गे कोरोनाचे आगमन झाले आहे. शेजवळवाडी (साबळेवाडी), मस्करवाडी (धामणी), आचरेवाडी, बागलवाडी, शितपवाडी, कुंभारगाव येथे सात नवे रुग्ण सापडल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे. सध्या हे रुग्ण कऱ्हाडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार घेत असून, त्यांच्या निकट सहवासीताना तळमावले व पाटण येथील विलगीकरण कक्षात, तर संपर्कात आलेल्या अन्य लोकांना होम क्‍वारंटाइनमध्ये ठेवले आहे. कुंभारगाव येथील बाधित व्यक्तीलाही मुंबई प्रवासाची हिस्ट्री आहे. चार दिवसांपूर्वी संबंधित व्यक्ती गावी आली असून, अस्वस्थ वाटू लागल्याने ते सुरुवातीला कऱ्हाडच्या सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आणि नंतर तेथीलच एका खासगी हॉस्पिटलमधून कृष्णा रुग्णालयात दाखल झाले. रात्री त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. मात्र, तत्पूर्वी काल दुपारनंतर त्यांच्या निकट सहवासातील व्यक्तीसोबत खेळलेला सुरपाट्याचा खेळ कुंभारगाव येथील अनेक कुटुंबांचे टेंशन वाढवायला कारणीभूत ठरला आहे. तेथील माध्यमिक विद्यालयाच्या मैदानावर अडीच ते तीन तास हा खेळ रंगलेला होता, असे ग्रामस्थांनी सांगितले.
 
या प्रकारामुळे तेथील 25 खेळाडूंची टीम क्वारंटाइन करण्यात आली आहे. त्या सर्वांना गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ठेवले आहे. कुंभारगावच्या विविध कुटुंबांतील 15 ते 22 वर्षे वयोगटातील ही मुले असल्याने निकट सहवासितांच्या स्वब तपासणीच्या रिपोर्टकडे गावकऱ्यांच्या नजरा लागल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून तळमावले- कुंभारगावातून विविध वाड्यावस्त्यांकडे जाणारा फक्त मुख्य रस्ताच सुरू ठेऊन त्या रस्त्याला मिळणारे गावातील पोटरस्ते अडथळे लावून बंद करण्याचे नियोजन आज सुरू होते. विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत पदाधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.

सातारा : गोडोली, जिहे, चंदननगर कोडोलीसह या तालुक्यांत काेराेनाचे रुग्ण आढळले

शरद पवारांनी शिवेंद्रसिंहराजेंना दिले 'हे' आश्‍वासन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Twenty Five Citizen Quarantine In Kumbhargoan Satara District