कैदी,पत्रकार काेराेनाबाधित हाेताच अतिरिक्त अधीक्षकांसह 15 पोलिस झाले क्वारंटाइन

कैदी,पत्रकार काेराेनाबाधित हाेताच अतिरिक्त अधीक्षकांसह 15 पोलिस झाले क्वारंटाइन

सातारा : गेल्या दोन दिवसांत सापडलेल्या कोरोना बाधितांमुळे पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही तारांबळ उडाली असून, अतिरिक्त अधीक्षकांसह तीन अधिकारी व 12 कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी साताऱ्यातील एका वृत्तवाहिनीचा कॅमेरामन कोरोनाबाधित सापडला. संबंधित कॅमेरामन हा काही कर्मचाऱ्यांबरोबर दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याही संपर्कात आला होता. त्यामुळे दोन वरिष्ठ अधिकारी क्वारंटाइन झालेत. दरम्यान, कारागृहातील तीन कैदी कोरोना बाधित निघाले आहेत. त्यापैकी एका कैद्याला चार जुलैला अटक करण्यात आली होती. या कारवाईमध्ये सहभागी असलेले व त्याच्या संपर्कात आलेला एक अधिकारी 12 कर्मचारीही क्वारंटाइन झाले आहेत.
महत्त्वाची बातमी : सातारकरांनाे या दिवशी पाणी येणार नाही 

दरम्यान सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 27 नागरिकांना आज (बुधवार) दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले आहे तसेच सात नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला असल्याचेही माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. यामध्ये खटाव तालुक्यातील बोंबाळे येथील 20 वर्षीय महिला, कराड तालुक्यातील चचेगाव येथील 45 वर्षीय महिला व 20 वर्षीय पुरुष, चचेगाव येथील 45 वर्षीय पुरुष, खंडोबानगर, मलकापूर येथील 8 वर्षीय बालक, 30 वर्षीय महिला, जावली तालुक्यातील रामवाडी येथील 48 व 30 वर्षीय महिला, 22 वर्षीय पुरुष व 5 वर्षाचा बालक, वाई तालुक्यातील बावधन येथील 57 वर्षीय पुरुष व 44 वर्षीय महिला, पसरणी येथील 37 वर्षीय महिला, कवठे येथील 35 वर्षीय पुरुष, सातारा तालुक्यातील नागठाणे येथील 53 वर्षीय पुरुष, सातारा येथील 26 वर्षीय पुरुष, वडूथ येथील 63 वर्षीय पुरुष, पाटण तालुक्यातील शेंडेवाडी (कुंभारगाव) 20 वर्षीय महिला, 18 वर्षीय युवक, पालेकरवाडी येथील 65वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष, फलटण रविवार पेठ येथील 45 व 27 वर्षीय महिला, 9, 6 व 4 वर्षीय बालिका व 7 वर्षाचा बालक यांचा समावेश आहे.

या शेतकर्‍यांसाठी आली आनंदाची बातमी : सेझसाठी संपादित जमिनी वगळल्या

उरमोडी धरणानजीकच्या 'त्या' प्रसिद्ध हाॅटेल चालकावर गुन्हा

सात जणांचा अहवाल कोरोना बाधित 

कोरोना बाधितांमध्ये सातारा तालुक्यातील चोरगेवाडी येथील 61 वर्षीय पुरुष, खंडाळा तालुक्यातील पळशी येथील 50 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 27 महिला, फलटण तालुक्यातील जाधवाडी येथील 12 वर्षीय युवती, फरंडवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, कोरेगाव तालुक्यातील फडतरवाडी येथील 47 वर्षीय पुरुष, खटाव तालुक्यातील पुसेगाव येथील 35 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
 
371 जणांचे नमुने पाठविले तपासणीला 

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुगणालय, सातारा येथील 14, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 52, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 53, ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 20, वाई येथील 24, शिरवळ 32, रायगाव येथील 24, पानमळेवाडी येथील 39, मायणी येथील 19, महाबळेश्वर येथील 3 , दहिवडी येथील 30, खावली येथील 22 असे एकूण 371 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी.एस, पुणे व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, असे डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

काॅंग्रेसच्या माेठ्या नेत्याला घेरण्याची भाजपची खेळी 

नव्या आदेश वाचा, लग्नात लिंबू धरण्यास मामाही उपस्थित राहू शकणार नाही

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com