
मायणी : ऊस तोडणीसाठी मजुरांची टोळी पुरवितो, असे आमिष दाखवून चितळी (ता. खटाव) येथील शेतकऱ्यांना सुमारे १३ लाख रुपयांचा गंडा घालणाऱ्या दोन ऊस टोळी मुकादमांना वडूज पोलिसांकडून अखेर अटक करण्यात आली. मच्छिंद्र शिवदास माने (रा. भूम, ता. भूम, जि. धाराशिव) आणि सचिन भानुदास जाधव (रा. कोळेगाव, ता. माळशिरस, जि. सोलापूर) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.