
मलकापूर: ट्रॅक्टरला मोटारसायकलने पाठीमागून दिलेल्या जोराच्या धडकेत दोघे जण गंभीर जखमी झाले. कोल्हापूर- पुणे मार्गिकेवर नांदलापूर (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दी दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींना कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळित झाली होती. विश्वनाथ बाळासो पवार (वय ५०, रा. कासेगाव) असे एका जखमीचे नाव असून, दुसऱ्याचे नाव समजू शकले नाही.