esakal | पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघातात तामिळनाडूचे दोघे ठार
sakal

बोलून बातमी शोधा

Accident

पुणे-बंगळूर महामार्गावरील अपघातात तामिळनाडूचे दोघे ठार

sakal_logo
By
हेमंत पवार

कऱ्हाड (सातारा) : महामार्गाकडेला उभ्या असलेल्या मालट्रकला कंटेनरने पाठीमागून धडक दिली. त्यामध्ये कंटेनरच्या चालकासह क्लिनर ठार झाला. पुणे-बंगळूर महामार्गावरील खोडशी गावजवळ काल मध्यरात्रीनंतर हा अपघात झाला. विश्वनाथन जगन्नाथन (वय ३३, रा. वेलामपट्टी, अथूर-तामिळनाडू) व सुब्बराम सिरंगराम आर (वय ३६, रा. विसू वसापुरम, आम्मापट्टी, तामिळनाडू) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचा: खंडाळ्यातील वीर धरणग्रस्तांच्या अडचणी सोडविणार; रामराजेंची ग्वाही

पोलिसांनी असे सांगितले की, कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेने निघालेला मालट्रक ( केएल ०८ बीक्यूं ४०३०) रविवारी मध्यरात्रीनंतर खोडशी गावच्या हद्दीतील हॉटेल अरोमासमोर थांबला होता. त्यावेळी पाठीमागून आलेल्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्यामुळे कंटेनरची (टीएन ६० एझेड ०८७१) मालट्रकला जोराची धडक बसली. हा अपघात एवढा भिषण होता की, कंटेनरमधील चालक आणि क्लिनर जखमी अवस्थेत केबिनमध्ये अडकून पडले होते.

अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यातील हवालदार प्रशांत जाधव हे कर्मचाऱ्यांसह तातडीने त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी जखमींना कंटेनरच्या केबिनमधून बाहेर काढून उपचारार्थ उपजिल्हा रुग्णालयात हलविले. मात्र, उपचारापुर्वीच त्या दोघांचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, महामार्गावर रात्रीच्या वेळी अंधारात मालट्रक उभा करून प्रवाशांच्या जिवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी मालट्रकचा चालक ए. के. सुनीलन (वय ५१, रा. आतीकवील हाऊस, ता. पुमंगलम, केरळ) याच्यावर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार प्रशांत जाधव यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे.

loading image
go to top