esakal | सातारा जिल्ह्यातील 800 नागरिकांचे स्वॅब तपासणीला; 240 नागरिक बरे झाले
sakal

बोलून बातमी शोधा

सातारा जिल्ह्यातील 800 नागरिकांचे स्वॅब तपासणीला; 240 नागरिक बरे झाले

सातारा जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये नागरिकांचे स्वॅब घेण्यात आल्या आहेत. त्यानूसार हे स्वॅब तपासणीसाठी विविध लॅबमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

सातारा जिल्ह्यातील 800 नागरिकांचे स्वॅब तपासणीला; 240 नागरिक बरे झाले

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : सातारा जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 240 नागरिकांना नुकतेच दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले. तसेच 800 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
 
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये कराडतालुक्यातील 42, खंडाळा तालुक्यातील 11, खटाव तालुक्यातील 9, कोरेगाव तालुक्यातील 18, महाबळेश्वर तालुक्यातील 4, पाटण तालुक्यातील 6,  सातारा तालुक्यातील 35, वाई तालुक्यातील 26  व इतर 89 असे एकूण 240 नागरिकांचा समावेश आहे.

इमारत थरथरत असतानाही त्याने १५ जणांचा वाचवला जीव, महाड दुर्घटनेतील हिरोची कहाणी...

800 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्वर्गीय क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथील आठ,  कराड 81, उपजिल्हा रुग्णालय फलटण 78, कोरेगाव 53, वाई 104, खंडाळा 99, रायगांव 54,  पानमळेवाडी 82, मायणी 32, महाबळेश्वर 45, पाटण 28, दहिवडी 32 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 104 असे एकूण 800 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

सावधान! तुमची देखील अशी हाेऊ शकते फसगत; आगाशिवनगरमधून 67 हजार लुटले

साताऱ्यातील कुख्यात वाळू तस्कर जेरबंद; एक पिस्तूल व दोन काडतुसे जप्त

loading image
go to top