

Wathar Station Accident
वाठार स्टेशन: वाठार स्टेशन (ता. कोरेगाव) येथे आज सायंकाळी पाचच्या सुमारास झालेल्या दुचाकींच्या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. सागर लालासाहेब माने (वय २९, रा. वाठार स्टेशन) व किशोर नंदू कदम (वय ४०, रा. सोमनाथ, ता. जळगाव, जि. जालना) अशी मृत युवकांची नावे आहेत.