जिल्ह्यात दोन हजार २०० सौरपंप

भारनियमनापासून सुटका; मुख्‍यमंत्री सौर कृषिपंप योजनेस प्रतिसाद
Solar
Solar sakal

-गिरीश चव्‍हाण

सातारा : लोडशेडिंग व इतर कारणांमुळे वीजपुरवठा खंडित झाल्‍यानंतर शेतातील पिकांचे नुकसान टाळण्‍यासाठी शेतकऱ्यांना प्रयत्नांची पराका‍ष्‍टा करावी लागते. शेतकऱ्यांची होणारी ही परवड थांबवण्‍यासाठी दुर्गम तसेच इतर भागातील शेतकऱ्यांसाठी राज्‍य शासनाने मुख्‍यमंत्री सौर कृषिपंप योजना जाहीर केली असून या योजनेतून जिल्ह्यात ‍सद्य:स्‍थितीत विविध अश्‍‍वशक्‍तीचे सुमारे दोन हजार २०० सौरपंप कार्या‍न्‍वित आहेत.

पाणी आणि वीज या दोन मूलभूत गोष्‍टींवर शेतीचे अर्थशास्‍त्र अवलंबून असते. उपलब्‍ध पाण्‍याचा ताळेबंद मांडत प्रत्‍येक शेतकरी पिकांचे नियोजन करतो. या नियोजनात अनेक वेळा विजेचा मोठा अडसर ठरतो. लोडशेडिंग, वीज वाहिन्‍या तुटणे, डीपी चोरीस जाणे व इतर अनेक कारणांमुळे ग्रामीण भागातील वीजपुरवठा अनेकवेळा खंडित होत असतो. खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत होण्‍यास अनेक दिवस लागत असल्‍याने या काळात पाण्‍याअभावी पिकांचे नुकसान होते.

Solar
साताऱ्यात वाहन दंड कमी करण्‍यासाठी आंदोलन

लोडशेडिंग व इतर कारणांमुळे पाण्‍याअभावी शेतीपिकांचे होणारे नुकसान टाळण्‍यासाठी दुर्गम तसेच इतर भागातील शेतकऱ्यांसाठी राज्‍य शासनाने मुख्‍यमंत्री सौर कृषिपंप योजना जाहीर केली आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना पाच ते दहा टक्के इतका लाभार्थी हिस्‍सा वीज वितरणकडे जमा करावा लागतो. लाभार्थी हिस्‍सा जमा केल्‍यानंतर अर्जदार शेतकऱ्याच्‍या क्षेत्राची पाहणी करण्‍यात येते. पाहणीदरम्‍यान उपलब्‍ध क्षेत्र, उपलब्‍ध पाणीस्‍त्रोत, पीकपध्‍दती व इतर बाबींचा विचार करून गरजेनुसार शेतकऱ्यांना तीन ते पाच अश्‍‍वशक्‍तीचे सौरपंप पुरविण्‍यात येत असून त्‍यासाठीची कंपनी निवडण्‍याचे पूर्ण स्‍वातंत्र्य शेतकऱ्यास देण्‍यात आले आहे.

ही योजना सुरू झाल्‍यानंतर जिल्ह्या‍तील शेतकऱ्यांनी सौरपंप मागणी अर्ज वीज वितरणकडे केले होते. या अर्जांची छाननी करून गेल्‍या दोन वर्षांत जिल्‍ह्यात तीन अश्‍‍वशक्‍तीचे एक हजार ८८० आणि पाच अश्‍‍वशक्‍तीचे ३१४ सौरपंप कार्यान्‍वित करण्‍यात आले आहेत.या पंपांमुळे शेतकऱ्यांना दिवसभर मोफत आणि प्रदूषणविरहित अखंडित ऊर्जा मिळण्‍याचा मार्ग सुकर झाला असून कोणत्‍याही अडथळ्याविना शेतातील पिकांना पाणी देणे त्‍यांना आता शक्‍य होत आहे.

शेतकऱ्यांनी लाभ घ्‍यावा : गौतम गायकवाड

लोडशेडिंग व इतर कारणांमुळे शेतकऱ्यांना पिकांची जोपासना करताना अडचणी येत असतात. या अडचणीतून शेतकऱ्यांची सुटका व्‍हावी, यासाठी मुख्‍यमंत्री सौर कृषिपंप योजना जाहीर करण्‍यात आली आहे. योजनेत सहभागी होण्‍यासाठी अत्‍यंत सोयीस्‍कर आणि सोपी प्रक्रिया तयार करण्‍यात आली असून त्‍याची माहिती वितरणच्‍या वेबसाईटवर उपलब्‍ध आहे. या योजनेचा लाभ जास्‍तीत जास्‍त शेतकऱ्यांनी घेणे आवश्‍‍यक आहे, असे आवाहन वीज वितरणचे वरिष्ठ अभियंता गौतम गायकवाड यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com