

Karad Drainage Work Accident Two Workers Trapped in Deep Pit for Nearly 45 Minutes Rescued by Fire Brigade and Locals
sakal
कऱ्हाड: येथील सोमवार पेठेतील पत्राचाळीनजीकच पालिकेच्या ड्रेनजच्या कामासाठी काढलेल्या खड्ड्यात दोन मजूर अडकले होते. मात्र त्यांना अग्नीशामक दलासही स्थानिक नागरीकांनी सखरूप बाहेर काढले. दोघेही किरकोळ जखमी आहेत. त्यांच्यावर येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. ड्रेनजचे काम सुरू असताना आवश्यक ती सावधागिरी न बाळगल्याने दुर्घटना घडली आहे, असे त्या परिसरातील स्थानिकांनी सांगतिले. त्या संदर्भात पालिकेनेही योग्य ती चौकशी करावी, अशीही मागणी होत आहे.