कार-ट्रकच्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार, एक गंभीर जखमी

Car-Truck Accident
Car-Truck Accidentesakal
Summary

तिघेजण रात्री दीड वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कारमधून फलटण बाजूकडून दहिवडीला येत होते.

दहिवडी (सातारा) : रात्री दीड वाजण्याच्या सुमारास दहिवडीजवळ (Dahiwadi) झालेल्या स्विफ्ट कार (Swift car) व ट्रकच्या भीषण अपघातात दहिवडीतील दोघे जागीच ठार झाले, तर एक गंभीर जखमी झाला आहे.

याबाबतची माहिती अशी, दहिवडीतील पियुष शैलेंद्र खरात (वय 22), स्वयंम सुशिल खरात (वय 16) व अक्षय दीपक खरात हे तिघेजण रात्री दीड वाजण्याच्या सुमारास स्विफ्ट कारमधून फलटण बाजूकडून दहिवडीला येत होते, तर त्याचवेळी एक ट्रक दहिवडी बाजूकडून फलटणच्या दिशेने चालला होता.

Car-Truck Accident
'झालं तेवढं बास झालं! आता आघाडी धर्माबाबत आम्ही ठरवू'

दहिवडी-फलटण रस्त्यावरील हिंदुस्थान पेट्रोलियम पंपासमोरील (Hindustan Petroleum Pump) वळणावर या दोन्ही गाड्यांचा समोरासमोर भीषण अपघात झाला. या अपघातात पियुष व स्वयंम हे जागीच ठार झाले, तर अक्षय गंभीर जखमी झाला आहे.

Car-Truck Accident
बुरुज अबाधित ठेवून प्रतिष्ठेचा गड जिंकणं NCP, BJP, काँग्रेसमोर मोठं आव्हान

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com