सुलतानवाडीतील दोन युवकांचा मृत्यू

पंढरपूर- कऱ्हाड महामार्गावर छोटा टेंपो व बोअरवेल मशिन वाहनाची
Ganesh Fadtare, Mahesh Fadtare
Ganesh Fadtare, Mahesh FadtareSakal

खरसुंडी - विभूतवाडी (ता. आटपाडी) येथे पंढरपूर- कऱ्हाड (मल्हारपेठ) महामार्गावर गुरुवारी रात्री छोटा टेंपो व बोअरवेल मशिन वाहनाच्या धडकेत दोघांचा मृत्यू, तर एक गंभीर जखमी झाला. या अपघातात टेंपोतील गणेश नानासाहेब फडतरे (वय १९) याचा जागीच व महेश विजय फडतरे (वय २९) याचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघेही (रा. सुलतानवाडी, ता. कोरेगाव) येथील आहेत. टेंपोतील निशांत फडतरे गंभीर जखमी झाले. अपघाताची नोंद आटपाडी पोलिसात करण्यात आली आहे.

पोलिस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, विभूतवाडी येथे चैतन्य मशिनरी पुसेगाव हा छोटा हत्ती टेंपो (एमएच ०५ बीएच ३४१४) शेतकरी कृषी यंत्र शेतकऱ्याला वितरण करून परतत असताना गावच्या पश्चिमेस स्मशानभूमी वळणावर बोअरवेल गाडीस धडक झाली. या अपघातात टेंपोतील गणेश नानासाहेब फडतरे (वय १९) याचा जागीच व महेश विजय फडतरे (वय २९) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोघेही सुलतानवाडी (ता. कोरेगाव) येथील आहेत. टेंपोतील निशांत फडतरे गंभीर जखमी झाले. त्यांना सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. हा अपघात गुरुवारी रात्री ११.३० वाजता झाला. अपघाताची माहिती फोनवरून सरपंच चंद्रकांत राजाराम पाहुणे यांनी आटपाडी पोलिसांना दिली.

विभूतवाडी गावाजवळ पश्चिमेस धोकादायक वळणावर रात्री अचानक साडेअकरा वाजता अपघात झाल्याचे ग्रामस्थांना समजतात नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मायणीहून बोअरवेल मशिन येत होते, तर विभूतवाडी येथे कृषी मशिनरी शेतकऱ्यांना वितरण करून परत मायणीकडे छोटा हत्ती टेंपो निघाला होता. टेंपोमध्ये महेश फडतरे, गणेश फडतरे व निशांत फडतरे तिघे होते. बोअरवेल मशिन आणि टेंपो यांची जोरदार धडक झाली. नागरिकांनी टेंपोतील तिघांनाही बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. बोअरवेल गाडी ही अचानक ब्रेक लावल्याने जागीच पलटी झाली. दोन्ही वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताचा तपास पोलिस हवालदार नारायण गारळे करत आहेत.

शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

कोरेगाव : आज दुपारी तीन वाजता सुलतानवाडीत शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. दोन चुलत भावांच्या मृत्यूमुळे सुलतानवाडी व कोरेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com