esakal | शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना डिवचल्यास बारा वाजवू; सामंतांचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना डिवचल्यास बारा वाजवू; सामंतांचा इशारा

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना डिवचल्यास बारा वाजवू; सामंतांचा इशारा

sakal_logo
By
उमेश बांबरे

सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विदर्भाच्या दौऱ्यावर असताना जनतेतून ठाकरेंसारखा मुख्यमंत्री आजपर्यंत झालेला नाही, अशी प्रतिक्रिया उमटली होती. याचाच काहींना पोटशूळ उठला आहे. कायम शिवसेनेवर व ठाकरे साहेबांवर टीका करायची. शिवसेना बदनाम कशी होईल, यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. शिवसेना घराघरापर्यंत पोचल्यानेच विरोधक टीका करत आहेत, असे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना त्रास देऊन डिवचण्याचा प्रयत्न केल्यास तुमचे बारा वाजवू, असा इशाराही त्यांनी विरोधकांना दिला.

आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्यावतीने शिवसंपर्क अभियान १२ ते २४ जुलैच्या दरम्यान आयोजिले आहे. या अभियानाचा प्रारंभ आज जिल्हा संपर्कमंत्री तसेच उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाला. या वेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार महेश शिंदे, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नितीन बानुगडे पाटील, धैर्यशिल कदम, जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, यशवंत घाडगे, युगंधरा साळेकर, रणजितसिंह भोसले, शारदा जाधव, अनिता जाधव, छाया शिंदे आदी उपस्थित होते. सामंत म्हणाले,‘‘शिवसंपर्क अभियानात आपल्याकडे १२ दिवस आहेत. धैर्यशिल कदम यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, काही लोक आपल्याला त्रास देतात. काहीजण जाणीवपूर्वक डिवचण्याचा प्रयत्न करत आहेत. आपण त्यांना या शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून संदेश द्या, तुम्ही आम्हाला डिवचले, तर आ्म्ही सुध्दा तुमचे बारा वाजवू शकतो. युती करणे, आघाडी करणे, महाविकास आघाडी करणे की स्वबळावर जाणे हा सगळा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील. पण, पक्ष वाढविण्याची भूमिका सर्वांनी घेतली पाहिजे. या अभियानात ज्या मतदारसंघात एकही शिवसेनेची शाखा नाही. तेथे पाच शाखा उद्‌घाटन करून मगच बैठका घ्या, अशी सूचना त्यांनी केली.

हेही वाचा: 'कोकणातून कोणीही पंतप्रधान झाले तरी शिवसेनेवर काही फरक पडणार नाही'

कायम शिवसेनेवर व ठाकरे साहेबांवर टीका करायची व शिवसेना कशी बदनाम होईल, यासाठी विरोधक प्रयत्न करत आहेत. शिवसेना घराघरापर्यंत पोहोचल्याची जाणीव झाल्याने विरोधक टीक करत असल्याचे सामंत यांनी नमुद केले. महेश शिंदे यांनी कोविड मध्ये चांगले काम केल्याबद्दल त्यांचे कौतूक करुन उदय सामंत म्हणाले, शिवसंपर्क अभियानात सातारा जिल्हा अग्रसेर आहे, हे सांगितल्यास उद्धव ठाकरे साहेब जिल्ह्यातील एकही काम मागे ठेवणार नाहीत. शिक्षण विभागात अनेक निर्णय मी घेतले. पण कोरोनात परिक्षा रद्द करणारा मंत्री अशी माझी ओळख झाली आहे. कोरोनामुळे आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला होता. आता कोरोना कमी होऊ लागला आहे, याबाबत पालक व विद्यार्थ्यांत दडपण आहे. पुढील वर्षी पुन्हा परिक्षा सुरू होतील. माझ्या मंत्रीपदाच्या माध्यमातून जिल्ह्यात कॉलेज देऊ शकतो. त्यामुळे सातारा जिल्ह्यात शैक्षणिक क्रांती करायची असेल तर पदाधिकाऱ्यांनी मागणी करावी, त्यांना कॉलेज देतो. आता तुम्ही सर्वानी पुढे येऊन स्वतःच्या संस्था निर्माण करा, त्यासाठी मी लागेल ते सहकार्य करेन, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवरायांवरील रिसर्च सेंटर रत्नागिरीत

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर महाविद्यालयात राष्ट्रगीत सुरू करण्याचा निर्णय आम्ही घेतला. तसेच २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा करण्याचा निर्णय घेतला. तर सहा जूनला शिवराज्याभिषेक दिनी शिवस्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यादिवशी शिवज्योत रॅली राज्यभर काढण्याचा शासन निर्णय लवकरच काढणार आहोत, असे सांगून मंत्री सांमत म्हणाले, या दिवशी लाखो विद्यार्थी शिवरायांना अभिवादन करण्यासाठी रॅलीत उतरतील. तसेच देशातील पहिले छत्रपती शिवाजी महाराजांवरील ग्रंथालय आणि रिसर्च सेंटर कोकणाच्या भूमीत रत्नागिरीत उभारले जाणार आहे. त्यासाठी दहा कोटी रूपये खर्च केले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा: बळीराजा सुखावणार! राज्यात 4 दिवस मुसळधार पावसाची शक्यता

loading image