esakal | उदयनराजेंचे सूचक विधान : लवकरच चांगले घडेल, फडणवीस आणि दरेकर राज्य ताब्यात घेतील
sakal

बोलून बातमी शोधा

उदयनराजेंचे सूचक विधान : लवकरच चांगले घडेल, फडणवीस आणि दरेकर राज्य ताब्यात घेतील

राज्यात लवकरच लोकहिताचे एकच उद्दीष्ट असलेले सरकार स्थापन होईल, असा आशावाद खासदार उदयनराजे भाेसले यांनी व्यक्त केला. एकनाथ खडसेंच्या पक्षांतराबद्दल मात्र त्यांनी भाष्य करणे टाळले. 

उदयनराजेंचे सूचक विधान : लवकरच चांगले घडेल, फडणवीस आणि दरेकर राज्य ताब्यात घेतील

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा :  स्वार्थापाेटी आणि स्वतःचे उद्दीष्ट साध्य झाल्यानंतर जनतेशी फारकत घेणारे आपण पाहतच आहात. बहुमत असून देखील केवळ राजकारणामुळे असे घडत असेल तर स्थिर सरकाराची नितांत गरज आहे. यामुळे राज्याची सूत्र ताब्यात घेऊन एक चांगल्या प्रकारचे शासना स्थापित करण्यासाठी मी देवेंद्र फडणवीस आणि प्रवीण दरेकर या दाेन्ही नेत्यांना शुभेच्छा देताे असे खासदार उदयनराजे भाेसले यांनी स्पष्ट केले.

विराेधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे सातारा जिल्हा दाैरा करीत आहेत. आज (गुरुवार) सकाळी त्यांनी उदयनराजेंची जलमंदिर पॅलेस येथे भेट दिली. त्यानंतर तेथून ते नुकसानग्रस्त भागास भेट देण्यास रवाना झाले.

राजेंच्या भेटीपूर्वी खडसेंच्या प्रवेशावर दरेकरांनी राष्ट्रवादीला खडसावले  

त्यानंतर पत्रकारांनी उदयनराजेंशी संवाद साधला. प्रश्नाेउत्ताेरात उदयनराजेंनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली. ते म्हणाले, राजकाराणापलीकडे जाऊन आपण सर्वसामान्यांचा विचार करणे आवश्यक आहे. ज्या सर्वसामान्य माणसांनी मतदान केले. त्या प्रत्येकाची ससेहाेलपट झाल्याचे दिसून येत आहे. किंबहूना प्रत्येकजण दिशाहीन झाल्या सारखे झाले आहे. बहुमत असून देखील केवळ राजकारणामुळे असे घडेत असेल तर स्थिर सरकार काेणच देऊ शकणार नाही.

सरकार काेणाची ही असाे. त्यामध्ये स्थिरता हवी. तरच शासन चांगल्या प्रकारे चालू शकते. जेव्हा विचाराने लोक एकत्र येतात तेव्हा एकत्र ठेवण्यासाठी ताकद लावावी लागत नाही. कारण त्यांचे उद्दीष्ट लोकहिताचे असते. हीच अपेक्षा महाराष्ट्रातल्या लोकांना आहे. मला खात्री आहे की लवकरच चांगले घडेल. लोकांचे प्रश्न मार्गी लागतील.

उदयनराजेंच्या ''सातारा विकास' ला भाजपचा ठेंगा!

दरम्यान भाजप शिखर गाठत असताना त्या पक्षाचा पाया मात्र खचत चालला आहे, या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधानावर खासदार उदयनराजेंनी प्रतिक्रिया देणे टाळले. काेणाच्या प्रतिक्रियांवर भाष्य करायला मी मोकळा नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

loading image