esakal | ही सातारकारांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट बातमी : उदयनराजे
sakal

बोलून बातमी शोधा

ही सातारकारांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट बातमी : उदयनराजे

खासदार उदयनराजेंनी सोशल मिडियाच्या माध्यमातून कोमल पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

ही सातारकारांसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट बातमी : उदयनराजे

sakal_logo
By
सिद्धार्थ लाटकर

सातारा : सामाजिक कार्यकर्त्या कोमल धीरज गोडसे (पवार) यांच्या निधनाचा धक्का आज (बुधवार) सातारकरांना सकाळच्या प्रहरी बसला. अनेकजण तिच्या आठवणी सोशल मिडियाच्या माध्यमातून मांडत श्रद्धांजली वाहत आहे. खासदार उदयनराजे भोसले यांनीही कोमलच्या जाण्याने धक्का बसल्याचे नमूद करुन तिने अवयवदानसाठी खूप मोठं काम केलं, तसेच गरजूंना वाटेल ती मदत, जनजागृती करण्याचे केले आहे. ही बातमी सातारकारांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट आहे असेही उदयनराजेंनी नमूद केले आहे. खासदार उदयनराजेंनी सोशल मिडियाच्या माध्यमातून कोमल पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
साताऱ्यात फक्त हॉटेल, लॉजिंग सुरू करण्यास मान्यता; वाचा नवा आदेश

उदयनराजे लिहितात शहराला अभिमान असलेला हसरा चेहरा कोमल पवार - गोडसे हिचं जाणं सातारकारांसाठीच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत वाईट बातमी आहे. कोमलला सन 2017 मध्ये "प्लमोनरी हायपरटेन्शन" या व्याधीचे निदान झाले आणि तिचे आयुष्य जणू तिथेच स्तब्ध झाले, पण तिने व तिच्या पतीने धीर सोडला नाही आणि ती मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली, महाराष्ट्रातील पहिली "दोन्ही फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण" झालेली व्यक्ती कोमल ठरली होती. पण तीन दिवसांपूर्वी कोमलचा आजार अचानक वाढल्यामुळे डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार यांनी तिला ताबडतोब हैदराबाद येथे शिफ्ट केले, परंतु आज पहाटे कोमल आपल्यात न राहिल्याची बातमी समजली आणि धक्का बसला. 

काेमल यांच्या विषयी वाचा -  कहाणी एका जीवन - मरणाच्या संघर्षाची...

कोमल आणि तिचे पती धिरज दोघांनी "कोमल न्यू लाईफ फाउंडेशन" या संस्थेची स्थापना केली होती, त्यामार्फत त्यांनी ऑर्गन डोनेशन साठी खूप मोठं काम केलं तसेच गरजूंना वाटेल ती मदत, जनजागृती केली. स्वभावाने अत्यंत प्रेमळ, मनमिळावू, हसतमुख अश्‍या कोमलला "सातारा" नेहमी स्मरणात ठेवेल. माझ्या अगदी लहान बहिणी प्रमाणे असलेल्या कोमलला भावपूर्ण श्रद्धांजली असेही उदयनराजेंनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये नमूद केले आहे.

सामाजिक कार्यकर्त्या काेमल पवार यांचे निधन, युवा वर्गात हळहळ

loading image