

“MP Udayanraje Bhosale announces ₹127 crore ropeway and funicular project for Pratapgad Fort; major boost to tourism in Satara.”
Sakal
सातारा : महाबळेश्वर तालुक्यात प्रतापगड हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे व गौरवशाली इतिहासाचे प्रतीक आहे. या ठिकाणी सर्व वयोगटातील लोक मोठ्या संख्येने येतात. अनेकदा इच्छा असूनही लहान मुले, वयस्कर नागरिक यांना गडावर चढता येत नाही. त्यांच्यासाठी रोपवे, फर्निक्युलर यंत्रणा यांची सुविधा आणि सुसज्ज वाहन तळही आवश्यक आहे. प्रतापगडाच्या पायथ्याला वन विभागाच्या खालोखाल प्रतापगड देवस्थानची जमीन आहे. या सुविधांसाठी आवश्यकता भासल्यास देवस्थानची जमीन उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही खासदार तथा प्रतापगड किल्ला विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष उदयनराजे भोसले यांनी दिली.