उदयनराजेंच्या इतरांचेही आरक्षण रद्द करा भुमिकेमुळे मराठा आंदोलनाची दिशा भरकटणार ?

उमेश बांबरे
Thursday, 1 October 2020

इतर समाजघटकांनी आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही.
 

सातारा  : देश स्वतंत्र झाल्यानंतर या देशातील राजेशाही संपुष्टात आणली असून, लोकशाही प्रस्थापित झाली आहे. लोकशाहीप्रदान देशातील खासदार उदयनराजे भोसले यांनी राजेशाहीतून बाहेर येऊन आरक्षणाची भूमिका समजावून घ्यावी, असे जाहीर आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा समन्वयक चंद्रकांत खंडाईत यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिले आहे. 

देशात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वैचारिक प्रेरणेतून संविधानात्मक आरक्षणाची भूमिका कशी आली आहे, त्याची पार्श्वभूमी समजावून घेऊन आरक्षणावर भाष्य करावे, असे सांगून श्री. खंडाईत म्हणाले,"" मराठा समाजाच्या आरक्षणाच्या आंदोलनाचे नेतृत्व करावे. मराठा समाजाला आरक्षणाची मागणी करण्याचा अधिकार लोकशाहीप्रदान देशामध्ये नक्कीच आहे. ती त्यांनी संविधानिक मार्गाने करावी. त्यास कोणत्याही इतर समाजघटकांनी कधीही विरोध केलेला नाही. उलट त्यांच्या मोर्चांना मदतच केली आहे. इतर समाजघटकांनी आमच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजास आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही.

ज्येष्ठ नागरिक दिन : ज्येष्ठांच्या कल्याणासाठी शासनाच्या महत्वपूर्ण योजना! 

असे असताना विनाकारण मराठा आंदोलनात राजकारण आणले जात आहे. सरकार मराठा समाजास आरक्षण देऊ शकत नसेल तर इतरांचेही आरक्षण रद्द करा, अशी मागणी उदयनराजे यांनी केल्याने मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाची दिशा भरकटण्याचाच विचार दिसत आहे.

आरक्षण देता येत नसेल, तर सगळेच आरक्षण रद्द करा : उदयनराजे

याचा विचार मराठा आरक्षण मागणीच्या आंदोलनकर्त्यांनी करावा, असेही खंडाईत यांनी स्पष्ट केले आहे.

पोटात वाढवलेलं बाळ मला कोरोनाशी झुंजायला बळ देत होतं!

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udayanraje Bhosale Should Understand Maratha Reservation Norms Satara News