खासदार उदयनराजेंचा वाढदिवस उत्साहात; राजमाता कल्पनाराजेंनी केलं औक्षण

खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आज जिल्हाभरात विविध उपक्रमांनी जल्लोषात साजरा करण्यात आला.
खासदार उदयनराजेंचा वाढदिवस
खासदार उदयनराजेंचा वाढदिवसSakal

सातारा : खासदार उदयनराजे भोसले यांचा वाढदिवस आज जिल्हाभरात विविध उपक्रमांनी जल्लोषात साजरा करण्यात आला. जलमंदिर या ठिकाणी खासदार भोसले यांना राजमाता कल्पनाराजे भोसले यांनी औक्षण केले. यावेळी शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्यांठ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. (Udayanraje Birthday Moment)

सातारा शहरात दिवसभर ठिकठिकाणी खासदार भोसले यांचे मोठ्या उत्साहात स्वागत केले जात होते. मुख्य रस्त्यावर मोठमोठे रंगमंच उभारुन कार्यकर्ते शुभेच्छा देताना दिसत होते. शहरातील तालीम संघाच्या मैदानावर रिक्षा सजावट स्पर्धा उत्साहात पार पडली. तसेच क्रांतिसिंह नाना पाटील रुग्णालय, रिमांड होम यासह जिल्हाभरातील विविध ठिकाणी खाऊ वाटप, ज्येष्ठ नागरिकांसमवेत केक कापून वाढदिवस जल्लोषात साजरा केला. शहरातील अनेक भागात पदाधिकारी व कार्यकत्यांनी मोठ्या प्रमाणात फ्लेक्स लावून शुभेच्छा दिल्या आहेत.

खासदार उदयनराजेंचा वाढदिवस
Ukraine-Russia War: PM मोदी आणि रशियन राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्यात फोन

खासदार भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात आठ ते दहा ठिकाणी रक्तदान शिबीराचे आयोजन करुन सामाजिक बांधिलकी जोपासली. तसेच, कोरेगाव, परळी, पुसेसावळी यासह जिल्हाभरात विविध विकासकामांचीही उदघाटने करण्यात आली आहेत. सायंकाळच्या सुमारास खासदार भोसले यांनी शुभेच्छांचा स्विकार केला. दिवसभर खासदार भोसले यांच्या वाढदिवसानिमित पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. या वातावरणात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com