
"In Sajur, Udaysingh Patil-Undalkar Appeals for Unity and Youth Support"
Sakal
तांबवे: गेली ५० वर्षे (कै.) विलासकाका यांनी सातारा जिल्ह्यात यशवंतरावांचे विचार जोपासले. जातीयवादी पक्षाच्या त्यांना ऑफर आल्या; पण ते पुरोगामी विचारांपासून ढळले नाहीत. सर्व जातीधर्माच्या लोकांना बरोबर घेऊन आम्हीही वाटचाल करत आहोत. आतापर्यंत जशी विलासकाकांना साथ दिली, तशीच साथ मलाही द्या, असे आवाहन रयत कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील- उंडाळकर यांनी केले.