Satara News : आढळलेला मृतदेह २५ ते ३० वर्षे वयाच्या तरुणाचा असावा, तसेच अंगात फक्त जीन्स पॅंट व पोटावर बायडिंग तारेने बांधले होते. त्यामुळे नक्कीच घातपात असावा, असा अंदाज पोलिस व वैद्यकीय सूत्रांनी वर्तविला आहे.
भुईंज : अनवडी (ता. वाई) येथे विहिरीत सापडलेल्या अनोळखी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी वाई पोलिस उपअधीक्षकांसह भुईंज पोलिसांनी तपासाला वेग दिला आहे. मृतदेहाच्या हातावरील टॅटूसह घटनास्थळी सापडलेल्या वस्तूंमुळे खुनाचा संशय व्यक्त होत आहे.