
-हेमंत पवार
कऱ्हाड: जिल्ह्यातील ग्रामीण भागातील महिलांनी आत्मनिर्भर करून त्यांना त्याच्या पायावर उभे करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून उमेद अभियानांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. त्याअंतर्गत जिल्ह्यात नऊ हजारांवर महिला लखपती दीदी झाल्या आहेत. त्यांनी केलेल्या कार्याचाच सन्मान म्हणून काही निवडक लखपती दीदींना केंद्रीय ग्रामविकास मंत्रालयाने दिल्लीत विशेष अतिथी म्हणून निमंत्रित केले. त्यात सातारा जिल्ह्यातील १६ महिलांचा समावेश होता. तेथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत संवाद साधून स्नेहभोजनाचाही मान देण्यात आला. या सन्मानाने लखपती दीदी भारावून गेल्या.