
शेणोली: वडगाव हवेली येथील सीताराम शंकरराव गायकवाड यांनी तयार केलेल्या सम्यक सांकेतिक लिपीची इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नुकतीच नोंद झाली. त्यांनी तयार केलेल्या सम्यक सांकेतिक लिपीत भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, मिलिंद प्रश्न ग्रंथ आणि भगवद्गीता या तीन ग्रंथांचे अनुवाद केले आहे.