esakal | कालेटेकच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसचे अजित यादव बिनविरोध

बोलून बातमी शोधा

Ajit Yadav
कालेटेकच्या उपसरपंचपदी कॉंग्रेसचे अजित यादव बिनविरोध
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

काले (सातारा) : कालेटेक ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या उपसरपंच पदावर युवा नेते अजित यादव यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. जयवंत यादव यांनी उपसरपंचपदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या या पदाची कालेटेक ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक झाली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून भूमी अभिलेख कार्यालयाचे उपअधीक्षक बाळासाहेब भोसले यांनी काम पाहिले. कालेटेक ग्रामपंचायतीवर माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण व कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस पै. नानासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील गटाची सत्ता आहे. यादव यांच्या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. निवडीबद्दल यादव यांचे कॉंग्रेसचे कऱ्हाड दक्षिण अध्यक्ष मनोहर शिंदे, जिल्हा परिषद सदस्य ऍड. उदयसिंह पाटील, डॉ. इंद्रजित मोहिते, पै. नानासाहेब पाटील, युवक कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शिवराज मोरे, जिल्हा परिषद सदस्या मंगल गलांडे, सरपंच पंडितराव हरदास, माजी सरपंच बाळासाहेब जावीर, माजी उपसरपंच जयवंत यादव, राहुल यादव आदींनी अभिनंदन केले.

'सरकारला नागरिकांना लुटून बिल गेट्‌सची सेवा करावयाची आहे'

Edited By : Balkrishna Madhale