esakal | दुर्गम भागात मोबाईल व्हॅनद्वारे लसीकरण! मिशन कवचकुंडल मोहिम
sakal

बोलून बातमी शोधा

Corona Vaccination

लसीकरण केंद्रांचीही संख्या वाढविण्यात आली आहे.

दुर्गम भागात मोबाईल व्हॅनद्वारे लसीकरण! मिशन कवचकुंडल मोहिम

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा: कोरोना लसीकरणासाठी जास्तीतजास्त नागरिकांचा प्रतिसाद मिळण्यासाठी मिशन कवचकुंडल मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेत जिल्ह्यातील दुर्गम भागात मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून लसीकरण करण्यात येणार आहे. याचबरोबर लसीकरण केंद्रांचीही संख्या वाढविण्यात आली आहे.

हेही वाचा: Indian Post : सातारा टपाल विभाग देशात अव्वल

जिल्ह्यात १ जानेवारीपासून लसीकरण मोहिम सुरू झाली. सुरुवातीच्या काळात लसीकरण मोहिम वेगाने सुरू होती. मात्र, त्यानंतर लशींचे डोस अपुरे पडू लागल्याने मोहिम मंदावली होती; परंतु ऑगस्ट महिन्यापासून लशींचे डोस जादा उपलब्ध झाल्याने लसीकरण मोहिम वेगाने सुरू झाली आहे. सद्यःस्थितीत जिल्ह्यात लशींचे डोस अधिक असताना नागरिकांचा प्रतिसाद थंडावला आहे. यासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने कवचकुंडल मोहिम राबविण्यात येत आहे. ही मोहिम यशस्वी करण्यासाठी लसीकरण सत्रांचीही संख्या वाढवून खासगी ४९४ व शासकीय ५८ केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. याचबरोबर जिल्ह्यातील अनेक दुर्गम भागातील नागरिक लसीकरणापासून वंचित आहेत. त्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी आरोग्य विभागाने सर्व्हे सुरू केला असून, मोबाईल व्हॅनद्वारे आरोग्य विभाग गावात पोचून घरोघरी लसीकरण केले जाणार आहे.

हेही वाचा: "सातारा जिल्ह्यात नवीन 100 बेडचे हॉस्पिटल उभारणार"

दरम्यान, जिल्ह्यात लसीकरणासाठी पात्र लोकसंख्या २१ लाख आहे. यामधील पहिला डोस सुमारे १८ लाख १५ हजार व दुसरा डोस सुमारे ७ लाख २५ हजार झाला आहे. त्यामुळे लसीकरणाचा पहिला डोस पूर्ण होण्यासाठी अद्यापही अडीच लाख लसीकरण होणे बाकी आहे. त्यामुळे मिशन कवचकुंडल मोहिमेअंतर्गत विक्रमी ४ लाख २० हजार उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. महिलांचे शंभर टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. खासगी संस्थांना सक्रिय सहभागी करून घेण्यात आले असून, कोविड लसीकरणाचे पूर्ण संरक्षित गाव करण्याचे उद्दिष्ट आखल्याचे आरोग्य विभागाने सांगितले आहे.

हेही वाचा: सातारा : कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या शिरला गावात

मिशन कवचकुंडल पुरस्कार

जिल्ह्यात आठ ऑक्टोबरपासून सुरू झालेली कवचकुंडल मोहिम १४ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे. या मिशन कवचकुंडल अभियानात उत्कृष्ट काम करणारे तीन प्राथमिक आरोग्य केंद्र, तीन उपकेंद्र, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये, नगरपालिका तीन तालुके व जिल्ह्यातील तीन ग्रामपंचायतींना पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील लसीकरण अंतिम टप्प्यात आले असून, जास्तीत-जास्त नागरिकांचे लसीकरण होण्यासाठी मिशन कवचकुंडल अभियान राबविण्यात येत आहे. या मोहिमेत प्रत्येकाचा सहभाग आवश्‍यक असून, लसीकरणापासून कोणीही वंचित राहणार नसल्याची दक्षता घेणार आहे.

- डॉ. राधाकिशन पवार; जिल्हा आरोग्य अधिकारी

loading image
go to top