esakal | Indian Post I सातारा टपाल विभाग देशात अव्वल; चार दिवसांत लाखाहून अधिक जणांचे आधार लिंकिंग
sakal

बोलून बातमी शोधा

Satara Postal Department
चार दिवसांत एक लाख ५२ हजार ८१३ नागरिकांचे आधार मोबाईल लिंकिंग

Indian Post : सातारा टपाल विभाग देशात अव्वल

sakal_logo
By
प्रशांत घाडगे

सातारा : टपाल विभागातर्फे आधार लिंकिंग मोहीम (Aadhaar Linking Campaign) राबविण्यात आली होती. या मोहिमेत चार दिवसांत एक लाख ५२ हजार ८१३ नागरिकांचे आधार मोबाईल लिंकिंग करण्यात आले आहे. त्यामुळे सातारा टपाल विभाग देशात सर्वाधिक आधार मोबाईल लिंकिंगचे व्यवहार करणारा ठरल्याची माहिती टपाल विभागाच्या वरिष्ठ अधीक्षिका अपराजिता म्रिधा (Postal Department Officer Aparajita Mridha) यांनी सांगितले.

सातारा टपाल विभागाने (Satara Postal Department) पोस्टमन व ग्रामीण डाक सेवकांच्या (Gramin Dak Sevak) माध्यमातून जिल्ह्यात सर्व टपाल कार्यालयांतून आधार कार्डला मोबाईल क्रमांक अद्ययावत करण्यासाठी चार दिवस विशेष मोहीम राबविण्यात आली होती. या मोहिमेला नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देऊन आधार लिंक केले. या मोहिमेत ५९६ टपाल कर्मचाऱ्यांद्वारे नागरिकांना घरपोच आधार अपडेट करण्याचा लाभ देण्यात आला आहे, तसेच संजय भोये शाखा डाकपाल आसू (ता. फलटण) यांनी एकाच दिवसात सातारा टपाल विभागात ५०७ आधार मोबाईल लिंकिंगचे व्यवहार केले असून, त्यांचा महाराष्ट्र टपाल विभागात प्रथम, तर देशात दुसरा क्रमांक पटकविला असल्याची माहिती म्रिधा यांनी दिली आहे.

हेही वाचा: उदयनराजेंचं मोठं वलय आहे, शब्द आहे.. यावर 'राजे' काय म्हणाले, माहितीय?

दरम्यान, आधार मोबाईल लिंकिंगमध्ये सुमारे पंधरा लाखांहून अधिक नागरिकांचे क्रमांक अद्ययावत करण्यात आले आहेत. यामध्ये, सर्वाधिक क्रमांक कऱ्हाड पूर्व उपविभाग कार्यालयात ३५ हजार ७२ करण्यात आले असून, कऱ्हाड पश्‍चिम उपविभागात २७ हजार २७१ नागरिकांचे आधार क्रमांक लिंक करण्यात आल्याची माहिती टपाल विभागाने दिली आहे.

हेही वाचा: 'टपाल' हा इतिहासाचा मौल्यवान ठेवा, काळ बदलला तरी महत्व कायम

सातारा टपाल विभागाच्या वतीने राबविलेली आधार लिंकिंग मोहिमेला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला. यामध्ये, टपाल विभागातील कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतल्याने ही मोहीम यशस्वी झाली.

-अपराजिता म्रिधा, वरिष्ठ अधीक्षिका, सातारा टपाल विभाग

loading image
go to top