esakal | कऱ्हाडात Corona Vaccine नसल्याने सात केंद्र बंद; नागरिकांचे दिवसभर हेलपाटे
sakal

बोलून बातमी शोधा

Vaccine Testing

कऱ्हाडात Corona Vaccine नसल्याने सात केंद्र बंद; नागरिकांचे दिवसभर हेलपाटे

sakal_logo
By
बाळकृष्ण मधाळे

कऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाड शहरातील कोरोबाधितांचा मृत्यूदर वाढत असून, शहराचा मृत्यूदर पाच टक्के झाला आहे. त्यामुळे शहरात चिंता वाढली आहे. कोरोनाचा हॉटस्पॉट होऊ पाहणाऱ्या शहरात 119 ऍक्‍टिव्ह कोरोनाबाधित आहेत. आजअखेर 103 नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. पालिकेने कोरोनाच्या विरोधात लढण्याची तयारी केली आहे. मात्र, त्यांना अपेक्षित कोरोना लशीसह चाचणीचे किट उपलब्ध होत नाही. केवळ कोरोना लस व किट उपलब्ध नसल्याने शहरातील सातही केंद्र सलग दुसऱ्या दिवशीही आज बंद होते. दिवसभर नागरिकांनी हेलपाटे मारले.

पालिकेने शहरात कोरोनाच्या विरोधात लढाई करताना सतर्कता बाळगली. मुख्याधिकारी रमाकांत डोके यांनी शहरातील दोन हजार 500 जणांच्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. शहरात 119 कोरोनाग्रस्त ऍक्‍टिव्ह आहेत. त्यात 91 नागरिक होम आयसोलेशनमध्ये आहेत. अन्य बाधित रुग्णालयात उपचार घेत आहेत. पालिकेने शहरात सात वेगवेगळ्या ठिकाणी लसीकरण केंद्र आहेत.

कोरोना चाचणीची दोन केंद्र आहेत. मात्र, तेथे लस व तपासणीचे चाचणी किट नसल्याने सलग दुसऱ्या दिवशी केंद्र बंद आहेत. शहरात कोरोनाचा कहर वाढत आहे. अशा स्थितीत शहरात मागणीप्रमाणे लस व चाचणी किट उपलब्ध होत नाही. त्यामुळे गरज असूनही शहरात एकाही व्यक्तीला आज लस देता आली नाही, तर एकाचीही कोरोना चाचणी करता आलेली नाही. शहरात पालिकेकडून किमान एक हजार लशीची रोजची मागणी आहे. प्रत्यक्षात 300 लस पालिकेला मिळत आहे.