
vaduj primary school preserving memories of 1942 Quit India struggle for future generations.
Sakal
वडूज : देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी त्या ठिकाणी तुरुंगवास भोगला. देशाला ब्रिटिशांच्या जोखडातून सोडविण्यासाठी ९ सप्टेंबर १९४२ च्या रणसंग्रामात घडलेल्या अनेक घटनांचा तो तुरुंग आजही साक्षीदार आहे. विशेषत: गेल्या चाळीस वर्षांपासून याठिकाणी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा भरविण्यात येत आहे. याठिकाणी ज्ञानार्जन करून अनेक सक्षम पिढ्या घडल्या आहेत.