

Stellar Performance: Vaishnavi Jagtap Wins Three Gold Medals in Para Swimming
Sakal
सातारा: हैदराबाद येथे झालेल्या २५ व्या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत वैष्णवी जगताप हिने सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक नोंदवली आहे. तिने ५० मीटर फ्रीस्टाईल, १०० मीटर फ्रीस्टाईल, ४ बाय १०० फ्रीस्टाईल रिले आणि ४ बाय १०० मेडले रिले या प्रकारांत सुवर्णपदक पटकावले, तर ५० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्यपदक मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली.