
Vaishnavi Kale from Maldan celebrates her appointment at Google, marking an inspiring achievement for young aspirants.
Sakal
-राजेश पाटील
ढेबेवाडी: मालदन (ता. पाटण) येथील वैष्णवी संजय काळे हिची जागतिक कीर्तीच्या गुगल या नामांकित कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून निवड झाली आहे. कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर गावच्या लेकीने वांग खोऱ्याचे नाव सातासमुद्रापार पोहोचविल्याने गावकऱ्यांचा ऊर अभिमानाने भरून आला असून, वैष्णवीवर कौतुकाचा वर्षाव सुरू आहे.