गिरीप्रेमींनाे! चला किल्ले वासाेट्याला, भ्रमंती हाेणार सुरु

गिरीप्रेमींनाे! चला किल्ले वासाेट्याला, भ्रमंती हाेणार सुरु

कास (जि. सातारा) ः बामणोली, तापोळा येथील बोटिंग आणि वासोटा पर्यटन पूर्ववत सुरू करावे, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडे केली. श्री. देसाई यांनी प्रशासनाला आठवडाभरात बामणोली, तापोळा येथील बोटिंग आणि वासोटा किल्ला पर्यटन सुरू करण्याच्या सूचना केल्या. यामुळे बोटिंग आणि पर्यटन लवकरच पूर्ववत सुरू होण्याचा मार्ग खुला झाला आहे. यासंदर्भात आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. त्या वेळी बामणोली, तापोळा येथील बोटिंग आणि वासोटा किल्ला पर्यटन पूर्ववत सुरू करण्याबाबत चर्चा केली. या वेळी भैरवनाथ बोट क्‍लबचे चेअरमन धनाजी संकपाळ, सचिव नीलेश शिंदे, संचालक, बामणोलीचे सरपंच राजेंद्र संकपाळ यांच्यासह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. मंत्री देसाई यांना याबाबत निवेदनही देण्यात आले.
 
कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर बामणोली, तापोळा येथील बोटिंग आणि वासोटा किल्ला पर्यटन गेल्या सात ते आठ महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाच्या सूचनेनुसार बंद आहे. दरम्यान, महाबळेश्‍वर येथील वेण्णा लेकमध्ये बोटिंग आणि महाबळेश्‍वर आणि पाचगणी येथील पर्यटन सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे बामणोली, तापोळा येथील बोटिंग आणि वासोटा किल्ला पर्यटनही सुरू करणे आवश्‍यक आहे. बामणोली, तापोळा परिसरातील हजारो लोकांचा उदरनिर्वाह बोटिंग आणि पर्यटनावर अवलंबून आहे. गेल्या सात- आठ महिन्यांपासून व्यवसाय बंद असल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

पाेलिस बनले भिकारी, रुग्ण अन् कुरिअर बाॅय; फरारी आराेपी पकडले

किमान दिवाळीनंतरच्या हंगामातील व्यवसायातून तरी येथील लोकांना उभारी मिळावी, यासाठी बामणोली, तापोळा येथील बोटिंग आणि वासोटा किल्ला पर्यटन त्वरित सुरू करावे, अशी आग्रही मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. मंत्री देसाई यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या मागणीनुसार तत्काळ वन विभाग आणि अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा केली. बामणोली, तापोळा येथील बोटिंग आणि वासोटा किल्ला पर्यटन सुरू करण्याच्या सूचना केल्या.

वासोट्याची भव्यता जोडीला अथांग शिवसागर

आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे या आठवड्यात बामणोली, तापोळा येथील बोटिंग आणि वासोटा किल्ला पर्यटन सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे बामणोली आणि तापोळा परिसरातील व्यावसायिकांचा प्रश्‍न सुटला आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com