

Arunrao Godbole passes Away
Sakal
सातारा : ज्येष्ठ कर सल्लागार, साहित्यिक, चित्रपट निर्माते, दिग्दर्शक व ज्येष्ठ सामाजिक नेते अरुणराव रामकृष्ण गोडबोले (वय ८२) यांचे आज निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी अनुपमा, मुलगा उदयन, सून संजीवनी, मुलगी डॉ. गौरी ताम्हणकर, जावई डॉ. हेमंत ताम्हणकर, बंधू अशोक व डॉ. अच्युत, पुतणे प्रद्युम्न व डॉ. चैतन्य, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच चिंतामणी नर्सिंग होम आणि त्यांच्या निवासस्थानी सातारकरांनी गर्दी केली होती. उद्या (बुधवार) सकाळी १० वाजता शनिवार पेठेतील ‘आनंदी निवास’ या त्यांच्या घरापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे. संगममाहुली येथील कैलास स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार होतील, अशी माहिती कुटुंबीयांच्या वतीने डॉ. अच्युत गोडबोले यांनी दिली.