
कऱ्हाड : पेन्शन योजना, शेतकरी सन्मान योजनेतून कर्जाची वसुली करता येत नाही. माझ्या खात्यामधून अशा पद्धतीने रक्कम वसूल होत असल्याने त्याबाबत संबंधित बँकेला कागदपत्रे दाखवली. त्यानंतर पेन्शन योजनेतून कर्ज वसुली बंद होऊन माझे वसूल केलेले आतापर्यंतची रक्कमही परत मिळाल्याचे येथील सेवानिवृत्त बॅँक कर्मचारी लालासाहेब भिसे यांनी सांगितले.