
सातारा: गेल्या पाच दिवसांपासून मुंबईतील मराठा आरक्षण आंदोलनाचा लढा अखेर यशाच्या उंबरठ्यावर पोहोचला. मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे- पाटील यांनी सुरू केलेले उपोषण आज मागे घेतले असून, राज्य सरकारने त्यांच्या बहुतांश मागण्या मान्य केल्या आहेत. या निर्णयामुळे सातारा जिल्ह्यात विविध ठिकाणी मराठा बांधवांनी जल्लोष करत एकजुटीचे दर्शन घडविले.