Satara News : 'बार बंदीसाठी म्हावशी, गुजरवाडीकर आक्रमक'; धार्मिक भावना दुखवल्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा
दाढोली ग्रामपंचायत हद्दीत मंदिराजवळच एकाने बार व हॉटेल व्यवसाय सुरू केला आहे. आठ महिन्यांपासून म्हावशी, गुजरवाडी ग्रामस्थांनी पाटण पोलिस व तहसीलदारांना लेखी निवेदनाद्वारे कळवले. मात्र, त्यावर काहीही प्रतिबंध झाला नाही.
Villagers of Mhavshi, Gujarwadi Demand Bar Closure; Warn of ProtestSakal
मल्हारपेठ : श्री क्षेत्र खंडुआई मंदिर परिसरातील बार बंद करण्यात यावा, यासाठी म्हावशी, गुजरवाडीतील ग्रामस्थांनी येथील पोलिसात निवेदन दिले. तातडीने हा बार बंद करण्यात यावा, अन्यथा आंदोलन करणार असल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.