

Koregaon Crime
Sakal
कोरेगाव : चिमणगाव फाटा (ता. कोरेगाव) आणि जरंडेश्वर शुगर मिलच्या प्रवेशद्वारावर ऊस वाहतूक करणाऱ्या एका ट्रॅक्टर चालकास कारखान्याच्याच अन्य ऊस वाहतुकीच्या दोन ट्रॅक्टर चालकांनी बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. या मारहाणीचे नेमके कारण समजू शकले नाही. जखमी ट्रॅक्टर चालकावर कऱ्हाड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.